प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना समज देणाऱ्या पोलिसालाच मारहाण करण्यात आल्याची घटना सांताक्रुझ पूर्व येथे सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून वकोला पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस शिपाई प्रदीप जगदाळे वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सांताक्रुझ पूर्व येथील वाकोला जंक्शन परिसरात रिक्षाचालक प्रवांशांना भाडे नाकारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहिल्यानंतर जगदाळे यांनी रिक्षा चालकांना आपले ओळखपत्र दाखवले आणि रिक्षाचालकांना समज दिली. त्यामुळे संतापलेला रिक्षाचालक आरिफ आदमअली शेख (३३) व युसुफ सद्दामअली शेख (३२) यांनी जगदाळे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर लोखंडी फायटर हातात घालून आरोपीने जगदाळे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यात जगदाळे यांच्या डोक्यावर व तोंडावर दुखापत झाली. पण जगदाळे यांनी दोघांनाही पकडून ठेवले. त्यानंतर त्यांना वाकोला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरिफ सांताक्रुझ पूर्व, तर युसूफ अँटॉपहिल परिसरातील रहिवासी आहे