अनिश पाटील
बेवारस मृतदेह व शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तीची माहिती याच्यात साधर्म्य होते. त्यामुळे हा मृतदेह अमान नावाच्या व्यक्तीचा असल्याचा संशय बळावला. गुन्हे शाखेने पोलीस ठाण्यातून अमानचे छायाचित्र मिळवून सापडलेल्या मृतदेहाशी जुळवून पाहिले.
कुर्ल्यातील मिठी नदीत एका तरुणाचा मृतदेह सापडला. सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पण केवळ रिक्षाच्या चावीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. मृत व्यक्ती अमान अब्दुल शेख रिक्षाचालक होता. या हत्येचा मुख्य सूत्रधार नफीस खानकडून अमान ३०० रुपये प्रतिदिन रिक्षा भाड्याने घ्यायचा. पण संशयाचे भूत नफीसच्या डोक्यात शिरले आणि त्याने मोहम्मद साकीर सेद व मुकेश पाल यांच्या मदतीने अमानचा काटा काढला.
नफीसकडे सहा रिक्षा होत्या. त्या सर्व तो भाड्याने द्यायचा. अमानही त्याच्याकडून रिक्षा भाड्याने घेत होता. त्यामुळे त्याचे नफीसच्या घरी येणे व्हायचे. त्या वेळी नफीसला अमानचे आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यातून पती-पत्नीमध्ये अनेक वेळा भांडणेही झाली होती. नेहमीच्या या भांडणांना कंटाळून नफीसची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे नफीसला अमानबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता.
हेही वाचा >>> मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी वाहतूक ब्लॉक
अमानप्रमाणे साकीर व मुकेशही नफीसकडून रिक्षा भाड्याने घ्यायचे. या दोघांच्या मदतीने अमानचा काटा काढण्याचा कट नफीसने रचला. नेहमीप्रमाणे ५ जानेवारीला अमान रिक्षाचे प्रतिदिन भाडे घेऊन नफीसच्या गोवंडी येथील घरी आला. त्या वेळी बोलण्यात गुंतवून नफीसने दोन्ही साथीदारांच्या मदतीने अमानचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर अमानचा मृतदेह रिक्षामधून मिठी नदीच्या जवळ नेला व मृतदेह फेकून त्यांनी रिक्षा जवळच उभी केली. नफीसने त्या रिक्षाच्या चाव्या स्वत:कडे ठेवल्या. दुसऱ्या दिवशी मिठी नदीत बेवारस मृतदेह सापडला. त्याची ओळख पटली नव्हती. त्यामुळे गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे वरिष्ठ निरीक्षक घनश्याम नायर यांनी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवली आहे का, याची तपासणी करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे अमान हा त्याच्या बहिणीसोबत गोवंडीत राहत होता. तो अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या बहिणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. बेवारस मृतदेह व शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तीची माहिती याच्यात साधर्म्य होते. त्यामुळे मृतदेह अमानचाच असल्याचा संशय बळावला. गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून अमानचे छायाचित्र मिळवून मिठी नदीत सापडलेल्या मृतदेहाशी जुळवून पाहिले आणि तो मृतदेह अमानचाच असल्याचे निश्चित झाले.
हेही वाचा >>> स्वयंपाकाबाबत नकारात्मक टिप्पणी क्रूरता नाही; पतीच्या नातेवाईकांवरील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बहिणीकडून अमानबद्दल अधिक माहिती घेतली. त्याची बहीण नफीसला ओळखत होती. अमान बेपत्ता झाल्यानंतर नफीस त्यांच्या घरी आला होता. अमान त्याची रिक्षा घेऊन गेलाय. खूप दिवस झाले तो परतला नाही. तो कुठे गेला आहे, असे तो विचारत होता, असे तिने पोलिसांना सांगितले. याबाबत नफीसकडेही चौकशी करण्यात आली. रिक्षा शोधत असताना ती मिठी नदीच्या पात्राशेजारी उभी असल्याचे एकाने सांगितले. त्यामुळे मी दुसऱ्या चावीने रिक्षा सुरू करून घरी परत आणल्याचे नफीसने सांगितले. पण रिक्षाबद्दल अमानच्या बहिणीकडे चौकशी करणाऱ्या नफीसने तत्पूर्वीच दुसऱ्या चावीच्या मदतीने रिक्षा सुरू करून घरी आणली होती. मग तो अमानच्या बहिणीकडे चौकशी करण्यासाठी का आला होता? नफीसची रिक्षा व दुसऱ्या चावीची गोष्ट गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना थोडी खटकली. त्यामुळे नफीसवर पोलिसांचा संशय बळावला. हत्येच्या दिवशी म्हणजेच ५ जानेवारीला नफीस कोठे गेला होता? तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी याची माहिती घेतली. त्या वेळी तो ५ जानेवारीला गोवंडी ते मिठी नदी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी केली असता तिन्ही आरोपी रिक्षातून मृतदेह घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही कार्यालयात बोलावून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी मृतदेह नेण्यासाठी वापरलेली रिक्षा व तिच्या दोन चाव्या जप्त केल्या. आरोपींच्या चौकशीत हत्येचे नेमके कारण समोर आले.