हिट अँड रन प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाल्यानंतर गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी केलेल्या ट्विटचा ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी समाचार घेतला. जर मला एखाद दिवशी हुकूमशहा होता आले असते तर गायक अभिजीतला नपूंसक बनवले असते अशा शेलक्या शब्दांत ऋषी कपूर यांनी अभिजीतला फटकारले. सलमानच्या शिक्षेचा निकाल येताच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सलमानला पाठिंबा दर्शवला. मात्र सलमानला पाठिंबा देण्याच्या नादात गायक अभिजीत यांचा तोल गेला व त्यांनी रस्त्यावर झोपणाऱयांना कुत्र्यासारखेच मरण येणार, असे वादग्रस्त ट्विट केले होते. या विधानावरुन टीका होताच अभिजीत यांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सलमानला पाठिंबा देणाऱयांवर चांगलेच नाराज झाल्याचे दिसते.
फुटपाथवर झोपणार तर कुत्र्याचेच मरण येणार, अभिजीत भट्टाचार्य यांचे वादग्रस्त ट्विट
गुरुवारी रात्री ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे सलमानच्या समर्थकांना खडेबोल सुनावले. मी देखील सलमानचा शुभचिंतक आहे, पण या प्रकरणात तुम्ही तर्कसंगत मत मांडायला हवे असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. अभिजीत आणि एजाजसारख्या मुर्खांची मला लाज वाटते. सलमानचा चमचा होण्यासाठी काही जणांचा खटाटोप सुरू असल्याचीही टीका त्यांनी केली. अभिजीत विषयीच्या घणाघाती ट्विटवर चर्चा रंगू लागल्याचे दिसताच काही वेळाने ऋषी कपूर यांनी ते ट्विट डीलीट केले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader