मुंबई : मुंबईतील बहुतांश बेकरी या पदार्थ भाजण्यासाठी भट्टीत खराब झालेली लाकडे वापरतात. त्या लाकडातून बाहेर पडणारी हानिकारक बाष्पशील सेंद्रीय संयुगे (व्हीओसी) ही पीठात शोषली जातात. त्यामुळे बेकरी उत्पादने खाणाऱ्या नागरिकांना कर्करोगाबरोबरच यकृत आणि फुप्फुसाचेआजार होण्याचा धोका वाढत आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात पावाच्या पीठात पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेट या रसायनांचा वापर केला जात असल्याचे नमूद केले. या रासायनिक घटकांमुळे मानवांमध्ये कर्करोग होण्याची आणि थायरॉईडची पातळी बिघडण्याची शक्यता वर्तवली होती. सीएसईच्या या अहवालानंतर बॉम्बे एन्व्हायर्नमेंटल ॲक्शन ग्रुपने (बीईएजी) बेकरी उत्पादनासंदर्भात केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले. त्यात बेकरीतील पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासह यकृत आणि फुप्फुसाचे गंभीर आजार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ‘मुंबईत शाश्वत बेकरी उद्योगाची क्षमता’ या शीर्षकाखाली केलेल्या अभ्यासात संशोधकांनी बेकरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या टाकाऊ लाकडांच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुरामुळे कर्करोगासारखा आजार होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

हेही वाचा : निनावी तक्रारीची मुभा हवी, निवासी डॉक्टरांची मागणी

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Mumbai Street Style Masala Pav Easy recipe
मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

घर-कार्यालयातील खराब झालेले फर्निचर, प्लाय लाकूड हे भंगारात काढल्यानंतर त्याचा वापर हा बऱ्याचदा विविध बेकऱ्यांमध्ये ज्वलनासाठी केला जातो. या फर्निचरसाठी गोंद, रंग, वाळवी लागू नये यासाठी लावण्यात येणारी रसायने याचा वापर केलेला असतो. अशी लाकडे जाळल्यानंतर त्यातील रसायने ही हवेबरोबर ओव्हनमधील वाफेच्या माध्यमातून आतील बेकरी उत्पादनांत सहज मिसळतात. उत्पादनामध्ये मिसळल्या जाणाऱ्या या रसायनांमुळे नागरिकांना कर्करोग, यकृत आणि फुप्फुसाशी संबंधित आजारांचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे बीईएजीचे अभ्यासक डॉ. तुहिन बॅनर्जी यांनी सांगितले.

हेही वाचा : अर्जामध्ये चुकीची टक्केवारी नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाकडून दिलासा, एमबीएच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी

मुंबईत साधारणपणे ६२८ नोंदणीकृत बेकरींमध्ये बेकरी उत्पादने तयार केली जातात. यापैकी ७२ बेकरींमध्ये उत्पादने बनविण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो. यामध्ये भंगारामध्ये काढलेल्या फर्निचरचाही मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्करोग, यकृत व फुफ्फुसाच्या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याची माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. बॅनर्जी यांनी सांगितले.