मुंबई : मुंबईतील वाढते तापमान, आद्र्रता आणि त्यामुळे जाणवणारा उष्मा यांमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या वाढत्या उष्म्यामध्ये काळजी न घेतल्यास नागरिकांना उष्माघाताचा धोका असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस उकाडा कायम राहणार आहे. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून आहे. त्यामुळे तापमानात घट न होता ते ३३ अंश सेल्सिअसइतके राहील. तसेच ते ३४ अंश सेल्सिअसखाली जाण्याची शक्यता कमी आहे.हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने बुधवारी ३३.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्राने ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. मुंबईतील आद्र्रतेमध्ये वाढ झाली असून हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ८० टक्क्यांच्या पुढे, तर सांताक्रूझ केंद्रात ७० टक्के होती. दुपारी १२ ते ३ या दरम्यान प्रखर उन्हात अतिनील किरणांच्या उत्सर्जनाचे प्रमाण खूप जास्त (यूव्ही इंडेक्स ९) असल्याची नोंद झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा