मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकातील मधल्या मोठया पादचारी पुलावर सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी सकाळी मोठया गर्दीला प्रवाशांना सामोरे जावे लागले. घाटकोपर मेट्रो स्थानकाकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी होत असून या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नियोजनासाठी मध्य रेल्वेकडून, किंवा मेट्रो प्रशासनानेही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अपघाताचा धोकाही संभवतो.

हेही वाचा >>> मुंबई : विस्तारीत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प; वाकोला आणि बीकेसीतील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार

builders January
वर्षाची सुरुवात बांधकाम व्यावसायिकांसाठी सकारात्मक, मागील १३ वर्षांतील जानेवारीमधील घरविक्रीचा उच्चांक
Mumbai airport accident
मुंबई विमानतळावर आलिशान गाडीच्या अपघातात पाच जण जखमी
Part of wall collapses in Mumbai University campus
मुंबई विद्यापीठात संकुलात भिंतीचा भाग कोसळला; विद्यार्थी थोडक्यात वाचले
Development permits under MMRDA now online
एमएमआरडीएच्या अखत्यारीतील विकास परवानग्या आता ऑनलाईन
Court orders housing societies to implement policy regarding e charging stations Mumbai news
ई-चार्जिंग स्टेशनबाबतचे धोरण अमलात आणा;  गृहनिर्माण संस्थांबाबत न्यायालयाचे आदेश
Mahakavi Kalidas Natya Mandir Theatre reserved for parking lot
वाहनतळासाठी नाट्यगृह आरक्षित; महाकवी कालिदास नाट्यमंदिरातील प्रकार
Budget 2025 for Middle Class Nirmala Sitharaman GDP Growth Rate
मेरे पास मिडलक्लास है! प्राप्तिकरदाता, बिहार, ‘गिग’ कामगारांसाठी भरीव तरतुदी
girish kuber
जुनी करप्रणाली अप्रत्यक्ष मोडीतच;‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत
nitin desai nd art world
नितीन देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्डला उच्च न्यायालयाचा दिलासा, कंपनीविरुद्धचा प्राप्तिकर विभागाचा आदेश रद्द

घाटकोपर स्थानकातून दरराेज सुमारे ३ लाख ८७ हजार प्रवाशांची ये-जा असते. दर दिवशी तिकिट खिडकीवरुन पावणे दोन लाखाहून अधिक तिकिटांची विक्री हाेते. घाटकाेपर स्थानक मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकात अप आणि डाउन दाेन्ही मार्गावरील जलद आणि धिम्या लाेकल थांबतात. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असला तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात प्रचंड गर्दी होत आहे. त्याची दखल माजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही घेतली होती. गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना कोंडी दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. एमआरव्हिसीकडून त्यावर काम सूरु असून उन्नत मार्ग, पादचारी पूल यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे स्थानकात गर्दीचे विभाजन होऊ शकेल. तोपर्यंत या स्थानकातील मोठया पादचारी पुलावर सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची गर्दी होत असून अपघाताचा धोका संभवत आहे. सोमवारीही चेंगराचेंगरी होईल अशाच गर्दीला प्रवाशांना सामोरे जावे लागले.

हेही वाचा >>> मुंबईच्या जलप्रक्रिया केंद्रावर सीसीटीव्हीची नजर

मोठा पादचारी पूल घाटकोपर रेल्वे स्थानकातील सर्व फलाटांना जोडण्यात आला आहे. घाटकोपरच्या मेट्रो स्थानकालाही तो जोडण्यात आला आहे. त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरून अनेकजण मेट्रोने अंधेरी रेल्वे स्थानक, वर्सोवा दिशेने जातात. वर्सोवा, अंधेरी येथून पुन्हा मेट्रोने घाटकोपर रेल्वे स्थानक गाठून मध्य रेल्वेने प्रवासी प्रवास करतात. परंतु सायंकाळच्या तुलनेत सकाळी आठनंतर घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या मोठया पादचारी पुलावर मेट्रोकडे जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांसमोर रांगा लागतात. या रांगा अक्षरशः रेल्वेच्या मोठया पादचारी पुलावर लांबपर्यंत जातात. त्याचवेळी प्रवाशांची तपासणीही मेट्रो प्रशासनाकडून होत असल्याने त्या प्रवाशांच्या रांगाही पादचारी पुलावर येतात. त्याचवेळी घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडून रेल्वे स्थानकाच्या वेगवेगळ्या फलाटावर जाण्यासाठी किंवा थेट मेट्रोकडे जाणारे प्रवासीही येत असल्याने गर्दी अधिक वाढते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील एका फलाटावरून दुसऱ्या फलाटाकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही या गर्दीतून जावे लागते.

मोठया पादचारी पुलावर होणाऱ्या प्रवासी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ शकते. मेट्रो झाल्यापासून ही समस्या अद्याप कोणीही सोडवलेली नाही. रेल्वे प्रवाशांचे खासकरून त्यात महिला, वृद्ध, अपंग, रुग्ण हे प्रवासी या पुलावरुन जाऊच शकत नाही. मध्य रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाने याची दखल घ्यावी.

नितीन गायकवाड, अध्यक्ष-निर्धार विकलांग विकास सामाजिक संघ

घाटकोपर रेल्वे स्थानकातील मेट्रोला जोडणाऱ्या मधल्या मोठया पादचारी पुलावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियोजनासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी लक्ष ठेवून असतात. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही गर्दीवर लक्ष ठेवले जाते. तसेच घाटकोपर स्थानकात प्रवाशांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पादचारी पूलासह अन्य सुविधा देण्यात येणार आहेत.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

कामे पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२३ ही अंतिम मुदत निश्चित

मेट्रो आणि लोकलमुळे घाटकोपर स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. घाटकोपर स्थानकाचा कायापालट करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या स्थानकापर्यंत प्रवाशांना सहज पोहोचता यावे यासाठी विविध सुविधा मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी)दिल्या जाणार आहेत. घाटकोपर स्थानकात ७५ मिटर लांब आणि १२ मिटर रुंद पादचारी पूल आणि पूर्वेला ४५ मिटर लांब आणि पंधरा मिटर रुंद स्थानकाला जोडणारा डेक तयार केला जाणार आहे.  मेट्रो स्थानक आणि सर्व पादचारी पुलांना जोडणारा हा एलिव्हेटेड डेक असेल. या स्थानकात एकूण तीन पादचारी पूल, तसेच स्कायवॉकची बांधणी करण्यात येईल. त्यासाठी ५० कोटींचा खर्च येणार आहे. सध्या पायाभरणीच्या कामासाठी स्टेशनमधील एका फलटावर काम सुरू केले आहे. या एलीव्हेटड डेक, पादचारी पूल यासह अन्य कामे पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२३ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

Story img Loader