मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाही त्यात यश मिळालेले नाही. गेल्या दोन वर्षांत राज्यात ५९,५९७ रस्ते अपघात झाले असून त्यात २७,०८४ जणांचा मृत्यू झाला. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये (जानेवारी ते नोव्हेंबर २०२२) वाढ झाली आहे.

राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि विविध सामाजिक संस्थांना घेऊन दर वर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबविते. या मोहिमेनंतरही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. राज्यात २०२१ मध्ये आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ मध्ये रस्ते अपघातांत ४७,७९३ जखमी झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. एकूण अपघातांपैकी २०२१ मध्ये २९ हजार ४७७ अपघात आणि १३ हजार ५२८ मृत्यू झाले असून २०२२ मध्ये ३० हजार १२० अपघातांमध्ये १३ हजार ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्येही वाढ असून २०२२ मध्ये २४ हजार ७२२ जखमींची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली असून २०२१ मध्ये हीच संख्या २३ हजार ७१ आहे.

1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान राज्य रस्ते सुरक्षा अभियानाला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीपीए सभागृहात या अभियानाचे उद्घाटन होणार आहे.

महामार्गावर वाढते अपघात

गेली १३ वर्षे रखडलेल्या कामामुळे मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रस्ते अपघातात १५० जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये ११८ अपघातात ११९ जणांचा मृत्यू झाला होता. ११ डिसेंबरपासून वाहनांसाठी खुल्या झालेल्या समृद्धी महामार्गावरही अपघातांनी पन्नाशी गाठली आहे. त्यापैकी तीन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू, तर २१ किरकोळ अपघातांमध्ये २९ जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे जुना मार्ग आणि मुंबई-पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण ८७७ रस्ते अपघात झाले असून त्यात ४०७ जणांचा मृत्यू झाला आणि ५६० जण जखमी झाले.

ठाणे शहर

’ २०२१ : अपघात ७८६, मृत्यू १९६, जखमी ७०४

’ २०२२ : अपघात ७७४, मृत्यू १९७, जखमी ६७९

पालघर जिल्हा

’ २०२१ : अपघात ४९९,  मृत्यू २९४, जखमी ३०९ 

’ २०२२ : अपघात ६३०,  मृत्यू २६९, जखमी ३८०

मुंबई शहर

’ २०२१ : अपघात २,२१४, मृत्यू ३८७, जखमी १,९४४

’ २०२२ : अपघात १,६७८, मृत्यू २६९, जखमी १,४३३

Story img Loader