वनक्षेत्रातील मालकी सांगणारा एकही दावा न आल्याने पुढील कामे लवकरच
इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : मुंबईपासून जवळ असलेला गोराई परिसर मुंबईला जोडण्याकरिता एमएमआरडीए गोराई-बोरिवलीदरम्यान नवीन पूल बांधणार असून त्याकरिता वनक्षेत्रातील ४.३२ हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या आदिवासींकडून पालिकेने हरकती, सूचना तसेच दावे मागवले होते. मात्र या परिसरातील मालकी हक्क सांगणारा एकही दावा १५ दिवसात आलेला नाही. आता अदानी कंपनीतर्फे या मार्गासाठी उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
मुंबई आणि गोराई गावामधून खाडी जाते. त्यामुळे जवळ असूनही या गावाचा मुंबईशी थेट संपर्क होऊ शकत नाही. या गावात जाण्यासाठी आजही बोटीने प्रवास करावा लागतो. गोराई गावाला मुंबईशी जोडण्याकरिता चारपदरी पूल बांधण्यात येणार आहे. या पुलासाठी ४.३२ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली असून त्याकरिता कांदळवनेही हटवावी लागणार आहेत. त्यामुळे या परिसरातील आदिवासी, मूळ जमीन मालक यांच्याकडून पालिकेच्या आर मध्य विभागाने हरकती व सूचना मागवल्या होत्या.
वन संरक्षण अधिनियम १९८० नुसार पालिकेच्या विभागीय कार्यालयाने कार्यवाही सुरू केली असून बाधित होणाऱ्या जागेतील दावे प्रतिदावे यांच्या हरकती व सुनावणी घेण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्या संस्थांवर आहे. त्यामुळे या हरकती, सूचना व दावे मागवण्यात आल्या होत्या. मात्र या हरकती व सूचना सादर करण्याची मुदत संपली असून मालकी हक्क सांगणारा एकही दावा आला नसल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वकार जावेद म. हाफीज यांनी दिली. या प्रकल्पावर हरकती घेणाऱ्या सूचना आलेल्या असल्या तरी आम्ही केवळ मालकी हक्क सांगणारे दावेच विचारात घेणार होतो. मात्र असे दावे नसल्यामुळे आता प्रभाग समितीपुढे तसा प्रस्ताव ठेवून मग त्याबाबत संबंधित प्राधिकरणाला कळवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मालकी हक्काचे दावे न आल्यामुळे आता या पुलासाठी उच्चा दाबाच्या विद्युत वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. त्या अदानी या कंपनीतर्फे टाकल्या जाणार आहेत. तसेच गोराई व बोरिवली येथील सध्या अस्तित्वात असलेल्या जेट्टींचा विकासही करण्यात येणार असून तो मुंबई मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात येणार असल्याचेही जावेद हाफीज यांनी सांगितले.
असा असेल पूल..
बोरिवली येथून एस्सेल वल्र्डला जाणाऱ्या जेट्टीपासून ते गोराईपर्यंत पूल असेल. या पुलाची लांबी ३.२ किमी असेल. त्यापैकी ०.५ किमीचा भाग हा गोराई खाडीवरून जाणारा असेल. पुलाची रुंदी २० ते २५ मीटर असेल. पूल तयार होण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल.