प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पावसाळा ओसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने टप्प्याटप्प्याने मुंबईमधील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्याचा निर्णय घेतला असून वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेल्या १६७ रस्त्यांच्या सिमेट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. ही कामे नियोजीत वेळेत पूर्ण करून मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.

दरवर्षी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमय होतात. तसेच जलमय होणाऱ्या सखल भागांमधील रस्त्यांची चाळण होते. मुंबईमधील मुख्य रस्तेही खड्डेमय होतात आणि वाहतुकीवर परिणाम होतो. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे अतोनात हाल होतात. तसेच पादचाऱ्यांनाही त्याचा फटका बसतो. पावसाळ्यात केवळ रस्तेच नव्हे तर पदपथांचीही दुर्दशा होते. पदपथांवर बसवलेले पेवर ब्लॉक खिळखिळे होतात आणि पाऊस पडल्यानंतर त्याखाली पाणी साचते. अशा पदपथांवरून चालताना डुगडुगणाऱ्या पेवर ब्लॉकमुळे पादचाऱ्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. हा प्रकार दरवर्षी पावसाळ्यात घडतो आणि मुंबईकर हैराण होतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला टीकेचे धनी व्हावी लागले.

हेही वाचा >>> “…म्हणुन मुंबईतून हातगाड्या हद्दपार होणार”, पालकमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबईकरांची खड्डेमय रस्त्यांतून सुटका व्हावी यासाठी मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशांचे पालन करीत महानगरपालिकेने मुंबईमधील ३९७ किमी लांबीच्या रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा संकल्प सोडला आहे. यामध्ये मुंबई शहरातील ७२ किलोमीटर, पूर्व उपनगरांतील ७१ किलोमीटर आणि पश्चिम उपनगरांतील २५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश असून त्यावर अनुक्रमे १,२३३ कोटी रुपये, ८४६ कोटी रुपये आणि चार हजार कोटी रुपये असे एकूण ६०७९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यापैकी काही रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी हाती घेतली होती. टप्प्याटप्प्याने ही कामे हाती घेण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> राज्यातील व्यपगत प्रकल्पांची संख्या वाढतीच; २०२३ मध्ये आतापर्यंत १७०२ प्रकल्प व्यपगत

रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण, दुरुस्ती वा नव्याने रस्ते बांधणी करण्यापूर्वी महानगरपालिकेला वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. दुरुस्ती कालावधीत संबंधित रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागते. त्यामुळे वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्याशिवाय महानगरपालिकेला रस्त्याची कामे सुरू करता येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने पावसाळ्यानंतर काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामांसाठी वाहतूक पोलिसांकडे अर्ज केला होता. वाहतूक पोलिसांनी १६७ रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदिल दाखविला असून पावसाळा सरल्यामुळे आता तातडीने ही कामे सुरू करण्याचा निर्णय रस्ते विभागाने घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते देण्याचा संकल्प सोडला आहे. पावसाळा ओसरल्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यांची कामे सुरू करण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेल्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. – पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त