मोबाइलवर छायाचित्रे काढून त्याद्वारे खड्डे बुजविण्याच्या तंत्रज्ञानावर एकेकाळी टीका करणाऱ्या मनसेला आता तेच तंत्र भावले असून आपली सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत त्याचा अवलंब करण्याचा विचार मनसेमध्ये वरिष्ठ पातळीवर सुरू झाला आहे. मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचा शोध घेण्यासाठी शिवसेनेने आणलेले हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्याने त्याचा नाशिकमध्ये वापर करण्याचा विचार सध्या मनसेमध्ये सुरू झाला आहे. मोबाइलवरून काढलेले खड्डय़ांचे छायाचित्र पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याचे तंत्रज्ञान प्रॉबिटी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकसित केले असून पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर पडणाऱ्या खड्डय़ांचा शोध घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशी भूमिका सत्ताधारी शिवसेनेने घेतली होती.
या तंत्रज्ञानामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील तब्बल २६ हजार खड्डे दृष्टीस पडले. या तंत्रज्ञानाबाबत मनसेने टीका केली होती.मात्र आता अचानक हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा शोध मनसेला नाशिकमध्ये लागला आहे.

Story img Loader