Heavy Rain in Mumbai : मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील किंग सर्कल, दादर टीटी, अंधेरी सब-वे, कांदिवली, वाकोला, कुर्ला आदी परिसरात वाहने बंद पडल्यामुळ तेथील वाहतूक मंदावली. याशिवाय हिंदमाता, अंधेरी सब वे, वडाळा, शिवडी येथे पाणी साचले होते. पाऊस कमी झाल्यावर काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत आहे. दरम्यान पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे व सक्कर चौक येथे पाणी साचल्यामुळे वडाळा व शिवडी येथे जाणारी वाहतूक मंद गतीने सुरू होती. याशिवाय अंधेरी सबवे येथेही पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूकही ठप्प झाली होती. याशिवाय कुर्ला एलबीएस रोडला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे तेथील वाहतूकही संथ गतीने सुरू होती.

हेही वाचा – अमरावती : कारागृहातील मित्राच्‍या वाढदिवसानिमित्‍त फेकले बॉम्‍बसदृश्‍य फटाके, दोघांना अटक; पोलिसांनी…

हेही वाचा – नागपूर : वॉर्डनला खोलीत बंद करून तीन मुली बालसुधारगृहातून पळाल्या; पोलिसांनी पकडल्यावर उघड झाले हत्याकांडाचे…

पावसामुळे मोठ्याप्रमाणात वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. अंधेरी आकृती मॉल येथे बेस्ट बस बंद पडल्यामुळे तेथील वाहतूक मंदावली होती. विमानतळावरील एलिव्हेटेल मार्गावर मोटरगाडी बंद पडल्यामुळे तेथील वाहतूकही प्रभावित झाली होती, वाहनांच्या बिघाडामुळे किंग सर्कल माटुंगा उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती. कुर्ला हॅलो डेपो, दादर टीटी, वाकाला येथील राम नगर सबवे येथेही वाहने बंद पडल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road traffic slowed down due to rain impact on traffic due to vehicle shutdown at various places mumbai print news ssb
Show comments