मुंबई : अलिबागसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) नियुक्ती झाल्याबरोबर अलिबागच्या विकासासाठी एमएमआरडीएने पहिले पाऊल टाकले आहे. अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचा विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून ३२५ कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या रस्ते विकासाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्तीची निविदा एमएमआरडीएने प्रसिद्ध केली आहे. शक्य तितक्या लवकर आराखडा तयार करून प्रत्यक्ष रस्ते विकासाच्या कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

राज्यातीलच नाही तर देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणजे अलिबाग. अलिबागला जाणारे अनेक रस्ते खराब असल्याने पर्यटकांना, स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. पण आता मात्र अलिबागला जाणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने नुकतीच एमएमआरडीएची पालघर, अलिबाग, वसई, पेण आणि खालापूर परिसरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्या निर्णयानुसार आता अलिबागचा विकास एमएमआरडीएच्या माध्यमातून साधला जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून आता अलिबाग तालुक्यातील १० गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
land acquisition for shaktipeeth expressway
आठवड्याभरात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात; कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ८२०० हेक्टर जमिनीचे संपादन
Permission , robotic parking lot, Mumbadevi,
मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Navi Mumbai corporation new policy car Parking problem
नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त

हेही वाचा – Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली

चौक, वावे, बेलकाडे, आक्शी, भोनांग, तळवली, गायचोळे, फसणापूर, बेलोशी अशा गावांमधील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी आणि प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी एमएमआरडीएने सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्तीसाठी आता निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. ही निविदा अंतिम करत आराखडा तयार करुन त्यास मंजुरी घेत त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्यांच्या विकास कामासाठी निविदा काढली जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – मुंबई : चित्रपट सृष्टीचा इतिहास उलगडणार, मेट्रो मार्गिकेतील खांबांखालील बॉलीवूड थीम पार्क साकारण्यास सुरुवात

या रस्त्यांचा होणार विकास

बुरुमखाना नाका ते वरसोली ते विठ्ठल मंदिर ते विद्यानगर बस स्टॉपपर्यंत रस्त्याचे बांधकाम

राजमळा ते थल चलमळा ते थल आगर ते थळ कलागेट ते भाल नाका या रस्त्याचे बांधकाम

नवगाव फाटा ते नवगाव ते किहीम गाव ते चोंडी नाका या रस्त्याचे बांधकाम

आवास फाटा ते आवासगाव ते ससवणे, दिघोडी ते कोळेगाव, रहाटळे ते म्हात्रे फाटा या रस्त्याचे बांधकाम

चौक नाका ते वावे नाका (७.५ किमी) रस्त्याचे बांधकाम

बेलकडे फाटा ते आक्षी बीच (३.८५ किमी) रस्त्याचे बांधकाम

भोनांग फाटा ते तळवली फाटा (४.५ किमी) रस्त्याचे बांधकाम

गायचोळे फाटा चाळ ते फणसपूर फाटा (४ किमी) रस्त्याचे बांधकाम

वावे नाका ते बेलोशी मार्ग मोहन फाटा (२.१० किमी) रस्त्याचे बांधकाम

भोनांग फाटा ते तळवली फाट्यावरील लहान पुलाचे बांधकाम

Story img Loader