वन विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा येथे सुमारे तीन कोटी रुपयांचा रक्तचंदनाचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरच कानविंदे फाटय़ाजवळ जुन्या घराच्या सागवान लाकडांची चोरटी वाहतूक करणारा ट्रक शहापूरच्या वनाधिकाऱ्यांनी पकडला. ट्रकसह सुमारे सात लाखांचा माल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी साकीनाका येथील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
कानविंदे गावाजवळील चिंचपाडा येथील प्रकाश फसाळे व लडकू फसाळे यांच्या जुन्या घराच्या सागवानी लाकडांनी भरलेला ट्रक मुंबईतील साकीनाका येथे नेत असताना महामार्गावरील कानविंदे फाटय़ाजवळ पाळतीवर असलेल्या वन विभागाच्या भरारी पथकाने पकडला. या प्रकरणी सागवान लाकूड विकत घेणारे साकीनाका येथील शकील अहमद खान, त्रिभुवन विश्वकर्मा, भैयालाल विश्वकर्मा, पंचराम विश्वकर्मा व ट्रकचालक विनोद कश्यप या पाचजणांना अटक करण्यात आली.  

Story img Loader