विक्रोळी पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळ सराफाचे एक दुकान गुरुवारी रात्री चार सशस्त्र गुंडांनी चाकू आणि बंदुकीच्या सहाय्याने लुटले. लुटारूंपैकी एकाचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
नामदेव पाटणे मार्गावरील डिसोजा चाळीत ‘राकेश गोल्ड ज्वेलर्स’ हे दुकान आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकानाचे मालक राकेश जैन दुकान बंद करत असताना चारजण बळजबरीने दुकानात घुसले. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत त्यांनी दुकानातील सुमारे १६ लाखांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. दुकानातील दोन सीसीटीव्ही क ॅमेरे त्यांनी दुकानात घुसताच क्षणी फोडून टाकले. परंतु दुकानाबाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका लुटारूचा चेहरा स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानात सुरक्षा रक्षक नव्हता. तीन लुटारूंनी चेहऱ्यावर कापड बांधले होते. पण चौथ्या लुटारूचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा