हार्बर मार्गावरील पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सोमवारी दुपारी येणाऱ्या रेल्वे गाडीतील चार प्रवाशांना सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक जवळ येताच चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. प्रवाशांकडील मोबाइल आणि रोख रक्कम घेऊन लुटारुंनी पोबारा केला. या झटापटीत एक प्रवाशी जखमी झाला. या घटनेमुळे उपनगरीय रेल्वेतील प्रवासही असुरक्षित झाल्याचे उघड झाले आहे.
पनवेलवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने निघालेली  रेल्वेगाडी दुपारी ३.१५ च्या सुमारास सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ येताच काही अज्ञात लुटारुंनी चाकूचा धाक दाखवून गाडीतच बसलेल्या चार प्रवाशांकडील मोबाइल आणि रोख रक्कम काढून घेतली. यावेळी एका प्रवाशाच्या हाताला चाकू लागला आणि तो जखमी झाला. हे प्रवाशी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर उतरले आणि त्यांनी पुढच्या डब्यातील प्रवाशांना घटनेची माहिती दिली. रेल्वे स्थानकावरील महिला पोलिसाने या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा