मुंबई : कर्जत-जामखेडमधील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी अधिसूचना जारी करण्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक आयोजित केली होती. पण साडेचार तास वाट बघूनही सामंत बैठकीसाठी फिरकले नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला.औद्योगिक वसाहतीच्या मागणीसाठी आमदार पवार यांनी भर पावसात विधान भवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर सोमवारी आंदोलन केले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना खडसावले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योगमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने पवार यांनी आंदोलन मागे घेतले होते. यानुसार उद्योगमंत्री सामंत यांच्या दालनात दुपारी अडीच वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे साडेचार तास वाट बघूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत. यातून माझी आणि माझ्या मतदारसंघाची फसवणूक झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar allegation of fraud by the industries minister amy
Show comments