मुंबई : मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमिन छेडा यांना शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम अर्धवट असताना ते पूर्ण झाल्याचा दावा करून मुंबई महापालिकेची सहा कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रोमिन छेडाची आठ तास चौकशी केली होती. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची पात्रता नसतानादेखील या कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंपनीला पालिकेची नऊ रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण केले नाही, तरी २०२१ मध्ये काम पूर्ण झाल्याचे दाखवून सहा कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोमिन यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानुसार ते कागदपत्रांसह कार्यालयात हजर झाले. या वेळी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची ८ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा >>>बोरिवली- विरार पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा; १२.७८ हेक्टर खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामे

या कंपनीचा मुखत्यारपत्रधारक रोमिन छेडा यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत केले. त्यामुळे मुदतीत प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची उभारणी पूर्ण झालेली नसताना प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. कागदोपत्री ते काम ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. तसेच बनावट अहवाल बनवले. तसेच तेवढय़ाच मर्यादित कालावधीसाठी विलंब शुल्क आकारले. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेला सुमारे सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले.

आरोप काय?

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निविदाकार हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने मूळ उत्पादक असलेल्या ‘युनिसी इंडिया प्रायव्हेट’ या कंपनीला गुणवत्ता पात्रतेचे निकष पूर्ण करत नसतानाही कंत्राट दिले, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे ते कंत्राट नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Romin chheda was arrested on the charge of defrauding the mumbai municipal corporation in the case of the corona gas project amy
Show comments