लोकसत्ता प्रतिनिधी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मुंबई : ग्रॅन्ट रोड येथील मौलाना शौकत अली रोडवरील शालिमार हॉटेलनजिक गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास युनायटेड चेंबर्स या इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील छत कोसळले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आणखी वाचा-मध्य वैतरणा धरणाच्या क्षेत्रात २६.५ मेगावॉट संकरित वीजनिर्मिती
ग्रॅन्ट रोड येथील युनायटेड चेंबर्सच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील छत कोसळताच रहिवाशांनी तात्काळ इमारतीबाहेर पळ काढला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, बेस्ट उपक्रम तसेच संबंधित पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य हाती घेण्यात आले. छताच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
First published on: 03-10-2024 at 12:56 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roof of building collapsed at grant road possibly trapping some people under debris mumbai print news mrj