मुंबईमध्ये आज अनेक हॉटेल इमारतींच्या गच्चीमध्ये गुपचूप हॉटेल सुरू आहेत. मात्र सरकारी यंत्रणांतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरू आहेत. पण आता ही बाब ‘सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपा’त समाविष्ट करण्यात आल्यामुळे पालिकेची रीतसर परवानगी घेऊनच गच्चीवर हॉटेल थाटता येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत महसूलही पडेल.

विदेशातील झगमगीत शहरांप्रमाणे मुंबईतही ‘रात्रजीवना’चा आनंद मुंबईकरांना आणि पर्यटकांना घेता यावा यासाठी शिवसेनेने मधल्या काळात प्रयत्न केला होता. त्याचाच एक भाग म्हणून हॉटेल इमारतीच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्यास पालिकेकडून परवानगी द्यावी अशी इच्छा शिवसेनेच्या युवराजांनी व्यक्त केली होती. युवराजांचा शब्द खाली पडू नये म्हणून पालिकेतील समस्त शिवसैनिक नगरसेवकांनी इमारतीच्या गच्चीवरील हॉटेलची भोई आपल्या खांद्यावर घेतली आणि ही कल्पना वास्तवात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले. ‘रात्र जीवना’च्या दृष्टीने शिवसेनेकडून टाकलेले हे पाऊल ओळखून भाजपने त्यास विरोध केला. अगदी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा मुद्दाही पुढे आला आणि ही कल्पना मागे पडली.
मुळात हॉटेल इमारतीच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्याची कल्पना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या पुत्राची. त्यासाठी आझमी पुत्र अधूनमधून पालिकेचे खेटेही घालत होते. पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कल्पना शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली आणि ती त्यांना भावली. एके दिवशी निवांत वेळी सायंकाळी महापौर बंगल्याच्या हिरवळीवर आदित्य ठाकरे यांनी हॉटेल क्षेत्रातील मातब्बरांची भेटही घेतली. परंतु भाजप आणि विरोधकांनी विरोधी सूर आळविल्यामुळे पालिका प्रशासनाला इमारतीच्या गच्चीवरील हॉटेलची कल्पना वास्तवात साकारणे अवघड बनले. काही महिन्यांमध्ये पालिकेतील शिवसैनिक नगरसेवकांना त्याचा विसरही पडला.
दरम्यानच्या काळात पालिका आयुक्तपदाची सूत्रे सीताराम कुंटे यांच्याकडून अजोय मेहता यांच्याकडे आली. पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपने अजोय मेहता यांच्या हाती पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती दिल्याचा डांगोरा शिवसेनेने पिटायला सुरुवात केली. मात्र, मुंबईच्या ‘विकास आराखडय़ा’वरून झालेला गोंधळ निस्तरण्याची वेळ अजोय मेहता यांच्यावर येऊन पडली. त्यापाठोपाठ नालेसफाई, रस्ते असे एकेक घोटाळे अजोय मेहता यांनी बाहेर काढले. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्याविरुद्ध धडक मोहीमच उघडली. संधी मिळताच आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची भाषाही शिवसेनेने केली. असे राजकारण खेळणाऱ्या शिवसेनेला अजोय मेहता यांनी एक सुखद धक्का दिला. मुंबईच्या ‘सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपा’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच वेळी आयुक्तांनी ‘सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपा’त हॉटेल, व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्याचे प्रस्तावित केले. आता ‘सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपा’तच ही बाब समाविष्ट झाल्यामुळे विरोधाला तशी जागा राहिलेली नाही.
मुळात मुंबईमध्ये संपूर्ण इमारतीमध्ये हॉटेल असलेल्या इमारती फारशा नाहीत. संपूर्ण इमारतच हॉटेलने व्यापली आहे अशी पंचतारांकित आणि सप्ततारांकित हॉटेल आहेत. त्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवरही हॉटेल सुरू करण्याची बाब महत्त्वाची आहे. काही भागांमधील व्यावसायिक इमारतींमधील उपाहारगृहात चूल पेटविण्यास परवानगी नाही. मात्र आता गच्चीवरती हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळताच खालच्या मजल्यावरील जागेत चूलही पेटविण्यास परवानगी मिळू शकेल. दुसरीकडे व्यावसायिक इमारतींमधील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना दुपारच्या जेवणासाठी आसपासच्या हॉटेल्समध्ये धाव घ्यावी लागत होती. आता त्याच इमारतीच्या गच्चीमध्ये त्यांना खानपानाची सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या अनेक मॉल्स ओस पडू लागले आहेत. या निमित्ताने मॉल्सच्या गच्चीवरील हॉटेलमध्ये पार्टी साजरी करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
गच्चीवरील हॉटेलचा ‘सुधारित विकास नियोजन आराखडय़ाच्या प्रारूपा’त समावेश केला असला तरी तेथे केवळ प्रसाधनगृह आणि एक ओटा उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेथे मंद आवाजात संगीताचा आनंदही लुटता येणार आहे. पण आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी मात्र हॉटेल चालकांना घ्यावी लागणार आहे.
मुंबईमध्ये आज अनेक हॉटेल इमारतींच्या गच्चीमध्ये गुपचूप हॉटेल सुरू आहेत. मात्र सरकारी यंत्रणांतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरू आहेत. केवळ अधिकाऱ्यांचे हात ओले होत आहेत. पण आता ही बाब ‘सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपा’त समाविष्ट करण्यात आल्यामुळे पालिकेची रीतसर परवानगी घेऊनच गच्चीवर हॉटेल थाटता येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत महसूलही पडेल. आयुक्तांच्या या एका निर्णयामुळे गच्चीवरील हॉटेल अधिकृत होऊ शकेल आणि दरवर्षी पालिकेच्या तिजोरीतील उत्पन्नात भरही पडत राहील. शिवसेनेच्या युवराजांच्या स्वप्नपूर्तीतून पालिकेला फायदा होणार इतकेच.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”