शिवसेनेची एक नगरसेविका परप्रांतीय फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर बोलत असताना काँग्रेसच्या नगरसेवकाने मध्येच कोटी करून त्यांना अडथळा आणल्याने संतप्त झालेल्या सेना व मनसेच्या नगरसेवकांनी ‘त्या’ नगरसेवकाच्या दिशेने धावून मारहाणीचा पवित्रा घेतला. मात्र जागरूक नगरसेवकांमुळे पुढील अनर्थ टळला.
कल्याण पालिका हद्दीतील फेरीवाल्यांचा उपद्रव आणि पालिकेची निष्क्रियता या विषयावर विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पालिकेच्या महासभेत तहकुबी मांडली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांशी फेरीवाल्यांशी असलेले साटेलोटे, त्यामुळे फेरीवाल्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव या विषयावर मते मांडली. मनसेचे नगरसेवक राहुल चितळे यांनी फेरीवाले हे व्यवसायाबरोबर छेडछाड, पाकीटमार हे धंदेही करतात, असे सांगून या परप्रांतीय भय्यांना येथून हटविले पाहिजे, अशी भूमिका सभागृहात मांडली. काँग्रेसचे नगरसेवक नवीन सिंग यांनी भय्या शब्दाला हरकत घेऊन तो विषय पटलावरून काढून टाकण्याची मागणी केली.
‘भय्या’ शब्दावरून महासभेत गदारोळ
शिवसेनेची एक नगरसेविका परप्रांतीय फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर बोलत असताना काँग्रेसच्या नगरसेवकाने मध्येच कोटी करून त्यांना अडथळा आणल्याने संतप्त झालेल्या सेना व मनसेच्या नगरसेवकांनी ‘त्या’ नगरसेवकाच्या दिशेने धावून मारहाणीचा पवित्रा घेतला.
First published on: 25-01-2013 at 03:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Row over bhaiya word in meeting