मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हाती घेतले असून याअंतर्गत मार्च – एप्रिल २०२३ या कालावधीत १९४ मुलांची घर वापसी करण्यात आली आहे. कौटुंबिक वाद, मुंबईचे आकर्षण आदी विविध कारणांमुळे मुले घरातून पळून मुंबईतील रेल्वे स्थानक गाठतात. मात्र, आरपीएफ विभागाने अशा मुलांचे मनपरिवर्तन करून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

हेही वाचा >>> मध्य, पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरून ‘रेलनीर’ गायब; नऊ खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास परवानगी

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र

अन्य राज्यांतील मुलांना मुंबईचे खूप आकर्षण असते. त्यामुळे ही मुले मुंबईत येतात. तसेच, काही मुले भांडण किंवा कौटुंबिक कलहामुळे कुटुंबियांना न सांगता, रेल्वेने प्रवास करून मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकात पोहोचतात. मात्र अनोळखी, गजबजलेले शहर पाहून ही मुले हरखून जातात. अनेक वेळा ही मुले रेल्वे स्थानकाच्या एका कोपऱ्यात रडत बसतात. रेल्वे स्थानकात पालकांशिवाय किंवा घाबरलेली, रडत असलेली मुले दिसल्यास प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी अशा मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस करतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे पुन्हा जाण्याचा सल्ला देतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

हेही वाचा >>> म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : ई नोंदणीत मोठी वाढ, मात्र अर्ज विक्री-स्वीकृतीला हवा तसा प्रतिसाद नाही

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत मार्च ते एप्रिल २०२३ या कालावधीत १९४ मुलांची घर वापसी केली. या मोहिमेत आरपीएफला रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. १९४ मुलांपैकी १४४ मुलगे आणि ५० मुलींचा समावेश आहे. ‘चाइल्डलाइन’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलांचे पालकांशी पुनर्मिलन करण्यात येते.

Story img Loader