मुंबई : अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य पात्र लाभार्थींच्या बँक खात्यावर ५९२ कोटी ३४ लाख ९० हजार ५३० रुपये वर्ग झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिली.
सन २०२२ आणि २०२३ आणि २०२४ मधील अतिवृष्टी, पूर बांधित. सन २०२२ – २३ आणि २०२३ – २४ मधील अवेळी पावसामुळे झालेले बाधित. सन २०२३ – २४ मधील अवेळी पाऊस, अतिवृष्टी बाधित, २०२३ मघील दुष्काळ बांधित आणि जून २०१९ मधील वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या पात्र लाभार्थींपैंकी आधारकार्ड आणि बँक खाते संलग्न असलेल्या ५ लाख ३९ हजार ६०५ लाभार्थ्यांच्या खात्यांवर डीबीटीद्वारे ५९२ कोटी ३४ लाख ९० हजार ५३० रुपये वर्ग करण्यात आले.
अमरावती विभागामध्ये ४ हजार ६७१ लाभार्थ्यांना ७ कोटी ४० लाख २९ हजार ८२० रुपयांची मदत मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ४ लाख ८३ हजार ८८३ लाभार्थींना ५१४ कोटी ८५ लाख २३ हजार २६० रुपये. नागपूर विभागात २० हजार ८९८ लाभार्थींना २६ कोटी ४३ लाख १० हजार ८६४ रुपयांची मदत मिळाली आहे. कोकण विभागामध्ये ८६५ लाभार्थ्यांना २१ लाख ८१ हजार ७८१ रुपयांची मदत मिळाली आहे. नाशिक विभागात १ हजार ९०९ लाभार्थ्यांना २ कोटी ७१ लाख ९१ हजार ७९१ रुपयांची मदत मिळाली आहे. पुणे विभागात २७ हजार ३७९ लाभार्थींना ४० कोटी ७२ लाख ५३ हजार १३ रुपयांची मदत मिळाली आहे.
बीड जिल्ह्याला सर्वाधिक १०६ कोटींची मदत नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्यांना करण्यात आलेल्या मदतीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला सर्वाधिक मदत देण्यात आली आहे. एकूण ५९२ कोटी ३४ लाख ९० हजार ५३० रुपयांपैकी एकट्या छत्रपती संभाजीनगर विभागाला ५१४ कोटी ८५ लाख २३ हजार २६० रुपयांची मदत मिळाली. जिल्ह्याचा विचार करता बीड जिल्ह्याला सर्वाधिक मदत करण्यात आली असून, जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९१० लाभार्थींना १०६ कोटी १२ लाख ७७ हजार ४२२ रुपयांची मदत वर्ग करण्यात आली आहे.