राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाने दिली आहे.
RSS Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat today tested Corona positive. He has normal symptoms and admitted to Kigsway hospital Nagpur.
— RSS (@RSSorg) April 9, 2021
आरटीपीसीआर करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे मोहन भागवत यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नितीन गडकरींचं ट्विट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत के कोरोना पॉजीटिव होने की खबर मिली। उन्हें शीघ्र स्वास्थ्य लाभ मिले ईश्वर से यही कामना करता हूं।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 9, 2021
भागवत यांना करोना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो”, असे ट्विट गडकरींनी केले आहे.