मुंबई: नवीन भाडेदर लागू केल्यानंतर रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल (रिकॅलिब्रेशन) करण्यासाठी चालकांना १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र ही मुदत उलटून गेल्यानंतरही मीटरमध्ये बदल न करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई कररण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईतील चार आरटीओने गेल्या तीन दिवसांत एक हजार एक चालकांना दंड केल्याची माहिती देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मुंबई : नवाब मलिक यांच्या मुलाविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई महानगरात ५० हजार टॅक्सी आणि साडेचार लाख रिक्षा असून नवीन भाडेदरानंतर मीटर बदलासाठी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंतची मुदत चालकांना देण्यात आली होती. मात्र ४० टक्केच मीटर बदल झाल्याने यासाठी १५ जानेवारी २०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली. त्यानंतर रिक्षा-टॅक्सी मीटर बदलासाठी चालक आरटीओत येऊ लागले होते. मात्र हे प्रमाण कमीच आहे. मीटरमध्ये बदल न करताच काही चालक प्रवाशांकडून दरपत्रकावरूनच भाडे आकारणी करीत आहेत. त्यामुळे जादा भाडे वसूल करण्याचेही प्रकार होत असल्याने प्रवासी आणि चालकांमध्ये वादही होत आहेत. त्यामुळे मुदतीतच मीटरमध्ये बदल करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला होता. त्यानुसार मुदत सपल्यानंतर प्रतिदिन ५० रुपये आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मुंबई : इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

त्यामुळे १६ जानेवारीपासून मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईत एकूण एक हजार एक रिक्षा-टॅक्सी चालकांना दंड आकारण्यात आला आहे. ताडदेव आरटीओकडून १६ जानेवारीला १११ टॅक्सी, १७ आणि १८ जानेवारीला अनुक्रमे १३७ आणि ८० चालकांना दंड केल्याची माहिती देण्यात आली. वडाळा आरटीओकडूनही ४९० रिक्षा चालकांना दंड झाला असून बोरिवली आरटीओकडे १६ जानेवारीपासून मीटर बदलासाठी रिक्षा न आल्याने दंड झालेला नाही. अंधेरी आरटीओनेही १८३ रिक्षा चालकांना दंड केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या चारही आरटीओनी आतापर्यंत ९६ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे.

काही प्रमाणात रिक्षांच्या मीटरमध्ये बदल

वडाळा आरटीओंतर्गंत ४७ हजार रिक्षांच्या मीटरचे, तर बोरिवली आरटीओंतर्गंत ३९ हजार ३६४ रिक्षा, ताडदेव आरटीओंतर्गंत २१ हजार ६३८ टॅक्सी आणि अंधेरी आरटीओंतर्गंतही काही प्रमाणात रिक्षांच्या मीटरमध्ये बदल करण्यात आला आहे.