वाहतूक विभागाकडून खाजगी वाहनाच्या टोईंग दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सन २००४-०५मध्ये वाहतूक विभागाकडून खाजगी कर्षित वाहनांसाठीच्या टोईंग दरांची निश्चिती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून या दरांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाच्या विचाराधीन होता. सन २००४-०५पासून झालेली महागाईचा विचार करून वाहतूक विभागाकडून सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाकडून  खाजगी कर्षित वाहनांसाठीचे सुधारित टोईंग दर १मे पासून लागू करण्यात येणार आहेत. खाजगी कर्षित वाहनांचे सुधारित दर पुढीलप्रमाणे.

वाहनांचा प्रकार                  सुधारित टोईंग दर
दुचाकी मो.वाहने                    १८० रूपये
कार, जीप                               ३६० रूपये
मोटार, टॅक्सी                          २७० रूपये
ऑटो रिक्षा                               १८० रूपये
मोटेम्पो ४०७                         ५४० रूपये
मोटार/ट्रक/ट्रॅक्टर/ट्रेलर          १०८० रूपये

Story img Loader