मुंबई : एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी त्याच्या ‘एक्स’ खात्यावरून विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश केल्याचे समोर आले आहे. हा मुलगा छत्तीसगडमधील असून त्याला पालकांसह सहार पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ‘६ ई १२७५’ व ‘६ ई ५७’ ही इंडिगो कंपनीची विमाने तसेच न्यू यॉर्ककडे निघालेल्या ‘एआय ११९’ या विमानांत सहा दहशतवादी सहा किलो आरडीएक्ससह संदेश ‘एक्स’वरील ‘फैजलुद्दीन ६९’ व ‘फैजलुद्दीन २७०७७’ या खात्यांवरून इंडिगो आणि एअर इंडियाच्या एक्स खात्यावर हा संदेश पाठविण्यात आला होता. फैजलुद्दीन निब्रान नावाच्या व्यक्तीने हे संदेश पाठवल्याचे भासवण्यात आले होते. या संदेशामुळे सोमवारी विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. इंडिगोची विमाने थांबवून त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली, तर न्यू यॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविण्यात आले.

The FASTag system is not updated even after the toll free by the state government Mumbai news
टोलमाफीच्या पहिल्या दिवशी ‘फास्टॅग’चा घोळ
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
baba siddique firing
Who killed Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी

हेही वाचा >>>सजावटीसाठीच्या प्लास्टिकच्या फुलांवरील बंदीचा निर्णय घेतला का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

याप्रकरणी सहार पोलिसांनी प्रशांत पालव यांच्या तक्रारीवरून धमकी व प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये बाधा आणल्याचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल केला होता. ‘एक्स’ (ट्विटर) कंपनीकडून या दोन खात्यांबाबत माहिती मागविण्यात आली असता ती एकाच व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले होते. अधिक तपास केला असता छत्तीसगडमधील एका अल्पवयीन मुलाने मित्राला अडकवण्यासाठी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने मित्राबरोबर मोबाइलचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय बंद पडल्यानंतर मित्राकडून सदर मुलाला तीन लाख रुपये येणे होते. या रागातून त्याने मित्राच्या खात्यावरून हा संदेश पाठविले असण्याची शक्यता आहे.

आणखी सात विमानांत बॉम्बची धमकी

सोमवारी मुंबई विमानतळावर झालेल्या गोंधळानंतर दुसऱ्याच दिवशी, सात विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे संदेश ‘एक्स’ खात्यावरून पाठविण्यात आले. जयपूर-अयोध्या-बंगळूरु (एअर इंडिया एक्स्प्रेस), डेहराडून-मुंबई (स्पाईसजेट), बागडोगरा-बंगळूरु (अकासा एअर), दिल्ली-शिकागो (एअर इंडिया), दम्मान (सौदी)-लखनऊ (इंडिगो), अमृतसर-डेहराडून-दिल्ली (अलायन्स एअर) आणि मदुराई-सिंगापूर (एअर इंडिया एक्स्प्रेस) या विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्यानंतर विविध विमानतळांवर दहशतवादविरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.