मुंबई : सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे ‘महाकुंभ मेळा’ सुरू आहे. देशातील विविध भागांतून मोठ्या संख्येने साधू – संत, सर्वसामान्य नागरिक, राजकीय, मनोरंजन आदी विविध क्षेत्रांतील मंडळी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. असे असताना प्रयागराज रेल्वे स्थानक बंद असल्याची अफवा पसरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अफवेमुळे भाविकांची गर्दी होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रयागराज रेल्वे स्थानक बंद असल्याच्या अफवांचे खंडन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाकुंभमेळ्यानिमित्त देशभरात रविवारी ३३० रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या. रेल्वे गाड्यांमधून १२.५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर, सोमवारी ३३४ रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून १४.४० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मंगळवारी १६४ गाड्या चालविण्यात आल्या असून त्यातून ८.६१ लाख प्रवाशांनी प्रवास केली. पश्चिम रेल्वेवरून उत्तर भारताच्या दिशेने महाकुंभमेळ्याजवळील स्थानकात दररोज १९ आणि साप्ताहिक ३३ रेल्वेगाड्या धावत आहेत. यासह अनारक्षित रेल्वेगाड्या, विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत, असे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी सांगितले. प्रयागराज जंक्शन आणि परिसरातील इतर सात स्थानके पूर्णपणे कार्यरत आहेत. तर, तात्पुरते बंद असलेले एकमेव स्थानक संगम आहे. जे अमृत स्नानाच्या एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर बंद होते, असे सिंह यांनी सांगितले.