रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केलं. यानंतर अजित पवार गटातील नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा निषेध करणारं ट्वीट केलं. मात्र, त्या या ट्वीटमुळे ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं. यूजर्सनी रुपाली चाकणकरांना फक्त निषेध काय करताय असं म्हणत अजित पवार गटात गेल्यानंतर त्यांचा सूर सौम्य झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.

एका युजरने रुपाली चाकणकरांच्या ट्वीटवर त्यांनी राज्य महिला आयोग अध्यक्ष म्हणून कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्य एका युजरने “अवस बाई इकडे, पुनव बाई तिकडे”, अशी यांची अवस्था असल्याची टीका केली. एका युजरने तर चाकणकर यांनी एकाचवेळी महिला आयोग अध्यक्षपदी आणि पक्षाच्या पदावर राहण्यावर आक्षेप घेतला. तसेच त्यांनी आयोगाचं पद सोडावं, नाहीतर पक्षाचं पद सोडावं, अशी मागणी केली.

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

“उगाच साळसूदपणाचा आव कशाला”

एका युजरने म्हटलं, “कशाला देखलेपणा करता. सगळे भ्रष्ट एका ठिकाणी जमा झाले आहेत. त्यामुळे आता नांदा सौख्य भरे. उगाच साळसूदपणाचा आव कशाला. सगळ्यांना सगळ्यातलं सगळं समजतं.” “रूपाली ताई तुमच्या आवाजात एवढी मधुरता कशी काय आली?” असा सवाल करत एका युजरने रुपाली चाकणकरांचा भूमिका घेण्यातील सूर बदलला असून आक्रमकता कमी झाल्याचं म्हटलं. तसेच त्या स्वतःच्या पक्षातील व्यक्तींसाठी वेगळी भाषा आणि इतरांना वेगळी वापरत असल्याचा आरोप केला आणि लवकर कारवाईची मागणी केली.

Rupali-Chakankar-get-trolled

“फक्त निषेधच करायचा होता, तर आम्हाला सांगायचं”

अन्य एका युजरने रुपाली चाकणकरांना गद्दार म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कारवाई करणार की केवळ निषेध नोंदवून काम झालं, असा सवाल केला. दुसऱ्या एका युजरने उपरोधिकपणे म्हटलं, “फक्त निषेधच करायचा होता, तर आम्हाला सांगायचं, आम्ही निषेध केला असता. एवढ्यासाठी तुम्ही कशाला तसदी घेतलीत.”

रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या होत्या?

रुपाली चाकणकर ट्वीटमध्ये म्हणाल्या, “आज एकेठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आलं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं. पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे.”

“भरत गोगावले, आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो. जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं. आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून त्यांच्या अनुपस्थित राज्यकारभार चालवण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी. आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते,” अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जुंपली; रुपाली चाकणकरांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा करताना म्हटलं, “मी आदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करू शकतो. महिला व पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना. त्यांच्यापेक्षा मला आमदारकीचा १५ वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन सहाच्या सहा आमदारांसह आमची सगळ्यांची एकच मागणी आहे, रायगडचा पालकमंत्री भरतशेठ.”

Story img Loader