नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारिया यांच्या हत्येचा तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. गृहमंत्र्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडे या हत्येचा तपास सोपविल्यानंतर गुन्हे शाखा सक्रीय झाली आहे.
गुन्हे शाखा १ चे प्रमुख रमेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून त्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणात यापूर्वीच माजी पोलीस अधिकारी सॅम्युअल अमोलिक याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बिल्डर लॉबी आणि अंडरवर्ल्डचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, संध्या सिंग खुनप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ६ करत आहे. चोरीच्या भीतीने त्या दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेल्या असाव्यात, असे पोलिसांनी सांगितले.
एस. के. बिल्डरच्या हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे
नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारिया यांच्या हत्येचा तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. गृहमंत्र्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडे या हत्येचा तपास सोपविल्यानंतर गुन्हे शाखा सक्रीय झाली आहे.
First published on: 23-02-2013 at 05:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S k builder murder case enqury transferred to mumbai crime branch