नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारिया यांच्या हत्येचा तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. गृहमंत्र्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडे या हत्येचा तपास सोपविल्यानंतर गुन्हे शाखा सक्रीय झाली आहे.
गुन्हे शाखा १ चे प्रमुख रमेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून त्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणात यापूर्वीच माजी पोलीस अधिकारी सॅम्युअल अमोलिक याच्यासह तिघांना अटक  करण्यात आली आहे.
या प्रकरणात बिल्डर लॉबी आणि अंडरवर्ल्डचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, संध्या सिंग खुनप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ६ करत आहे. चोरीच्या भीतीने त्या दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेल्या असाव्यात, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader