एसटी कामगारांच्या महागाई भत्त्याची जुलै ते सप्टेंबर २०१२ ची थकबाकी मार्चच्या वेतनात देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जुलै २०१२ पासून महागाई भत्ता मिळाला नव्हता. राज्य सरकारने महामंडळाच्या थकित रकमेपैकी २०० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर हा महागाई भत्ता देण्यात येत असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले. तीन महिन्यांची सात टक्क्यांप्रमाणे थकबाकी आणि मार्चचा महागाई भत्ता एप्रिल महिन्यात होणाऱ्या वेतनामध्ये मिळणार असून उर्वरित पाच महिन्यांची थकबाकी पुढील पाच महिन्यांनंतर देण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

Story img Loader