एसटीच्या कामगारांसाठी करण्यात आलेल्या प्रस्तावित करारामध्ये कायमस्वरूपी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ मिळावी, त्याचप्रमाणे या कराराची माहिती सर्व कामगारांसाठी एसटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी अन्यथा कामगार उत्स्फूर्तपणे एसटी बंद पाडतील, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)ने दिला आहे. तर १० टक्के वाढ देऊन व्यवस्थापन आणि मान्यताप्राप्त संघटना यांनी कामगारांची क्रूर चेष्टा केली असल्याचे आरोप मनसे राज्य परिवहन कामगार सेनेने केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि एसटी महामंडळ यांच्यात शनिवारी झालेल्या चर्चेमध्ये कनिष्ठ कामगारांसाठी चांगली वेतनवाढ देणाऱ्या करारास मान्यता देण्यात आली असली तरी कायमस्वरूपी कामगारांना यामध्ये केवळ १० टक्के वाढ देण्यात आली आहे.
एसटी कामगारांची २५ टक्के वेतनवाढीची मागणी
एसटीच्या कामगारांसाठी करण्यात आलेल्या प्रस्तावित करारामध्ये कायमस्वरूपी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ मिळावी, त्याचप्रमाणे या कराराची माहिती सर्व कामगारांसाठी एसटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी अन्यथा कामगार
First published on: 07-02-2013 at 04:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S t workers expectation for 25 percent increase in salary