विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून ( १७ जुलै ) सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) आमदारांनी सरकारविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गैरहजर होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर आमदार सचिन अहिर यांनी भाष्य केलं आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सचिन अहिर म्हणाले, “काही लोक नक्की आंदोलनाला आले होते. पण, आज पहिलाच दिवस असल्याने सर्वांची उपस्थिती नाही आहे. काहीजण येत आहेत. संयुक्तरितीने मंगळवारी सर्वजण आलेले दिसतील. पायऱ्यांपेक्षा सभागृहात काय भूमिका घेतली जाते, हे महत्वाचं आहे. आमदारांना एक-दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी लागेल.”

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!

हेही वाचा : VIDEO : शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून थोरात-फडणवीस आमने-सामने, नेमकं काय घडलं? वाचा…

“ज्या मतदारांनी आमदारांना मतदान केलं आहे, त्यांनाही उत्तर द्यावं लागणार आहे. नाहीतर आगामी काळात त्याच लोकांसमोर जात असताना तुमची भूमिका अशी का राहिली? असा जाब लोक विचारतील. कारण, मतदारांच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल दृष्टीकोन बदलत चालला आहे. हे चित्र स्थिर करायचे असेल, तर आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील,” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.

हेही वाचा : विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्या सात मिनिटातच नीलम गोऱ्हेंच्या पदावरुन जयंत पाटील आक्रमक

“विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंगळुरूला रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरेही रवाना होतील,” अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे.