महेश मांजरेकर दिग्दर्शित अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारल्यानंतर अभिनेता सचिन खेडेकर ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटातून मुख्यमंत्र्याची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्यासोबतच्या आणखी एका प्रमुख भूमिकेत महेश मांजरेकर झळकणार आहे. खेडेकर आणि मांजरेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असून लेखन अजित व प्रशांत दळवी यांनी केले आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात सर्वसामान्य माणसाचे स्थान काय आहे हे सर्वानाच माहीत आहे. परंतु, अशा वातावरणात लोकांसाठी झगडणारा मुख्यमंत्री अशा पद्धतीचे कथानक असून चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित होत आह़े
आणखी वाचा