अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून विरोधी पक्षातून थेट सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर आता अजित पवारांच्या या निर्णयावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ पोस्ट करत टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन सावंत यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचं अधोरेखित केलं आहे. तसेच फडणवीसांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

हेही वाचा : Maharashtra Politics Live : जयंत पाटील यांची ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका, राहुल नार्वेकर म्हणाले…

या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, “राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही, नाही, नाही. आपतधर्म नाही, शाश्वतधर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एकवेळ रिकामे राहू, सत्तेशिवाय राहू. मला कुणीतरी विचारलं की, तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही, नाही, नाही.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin sawant tweet old video of devendra fadnavis on alliance with ncp pbs