करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात मजूर-कामगार व रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. समाजातील अनेक महत्वाच्या व्यक्ती या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार लोकांना आर्थिक मदत केली आहे. यात मुंबई महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिनने High5 या NGO ला ही आर्थिक मदत केली आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या संस्थेला शुभेच्छा देत, गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी आपण छोटीशी मदत करत असल्याचं सांगितलं आहे. याआधीही सचिनने मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे. याआधीही सचिनने मुंबईत ५ हजार लोकांच्या अन्न-धान्याची सोय केली होती. याचसोबत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थाच्या करोनाविरुद्ध लढ्यात सचिन सहभागी झाला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar comes forward to support 4000 underprivileged people amid coronavirus pandemic psd