क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा आवडता छंद कोणता, असे त्यालाच विचाराल तर, ‘संगीत ऐकणे’ हे उत्तर हमखास मिळेल. पण एस. डी. बर्मन आणि किशोर कुमार यांच्या संगीताने नादावलेला सचिन तेंडुलकर एखाद्या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यासाठी आवर्जून हजर राहील, ही गोष्ट कोणाच्या स्वप्नातही आली नसेल. ‘देविशा’ फिल्म्सच्या ‘सत ना गत’ या चित्रपटाच्या संगीत अनावरणाला रंगशारदा येथे सचिन हजर राहिला, नव्हे, या चित्रपटाचे संगीत अनावरण त्याच्याच हस्ते झाले आणि ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात उतरली.
राजन खान यांच्या ‘सत ना गत’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटातील सर्व गाण्यांचे गीत लेखन सचिनचे वडील बंधू कवी नितीन तेंडुलकर यांनी केले आहे. या चित्रपटाच्या संगीत अनावरणाच्या निमित्ताने सचिनने आपल्या वडील भावाच्या पहिल्यावहिल्या चित्रपट गीताचे कौतुक करण्याची संधी सोडली नाही. माझ्या भावाचे गाणे एका चित्रपटात येत आहे, हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी सुखद धक्का आहे, असे सचिनने सांगितले. प्रविण कुंवर यांनी या चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा