मुंबई : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या डीप फेक चित्रफीत फिलिपिन्समधून अपलोड करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तेंडुलकरचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी या घटनेची पश्चिम विभागीय सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी ई-मेल कंपनीशी संपर्क साधला असून त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक माहिती मागितली आहे.

हेही वाचा >>> बेहिशोबी मालमत्तेबाबत सीबीआयकडून विमा कंपनीतील लिपीकाविरोधात गुन्हा, आरोपी ठाकरे गटाशी संबंधित

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…

सचिन तेंडुलकरच्या जुनी चित्रफीतीमध्ये फेरफार करून तो ऑनलाइन गेमची जाहिरात करत असल्याचे दाखविण्यात आले होते. समाज माध्यांवर ही चित्रफीत अपलोड करण्यात आली होती. याप्रकरणी फेसबूक वापरकर्ता आणि गेमिंग साइटच्या मालकाविरुद्ध भादंवि कलम ५०० (अब्रुनुकसानी) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (अ) (संवाद सेवेद्वारे आक्षेपार्ह संदेश पाठविल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता ही चित्रफीत फिलिपिन्समधून अपलोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यासाठी हॉट मेल या ई-मेलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी याप्रकरणी हॉटमेल कंपनीशी संपर्क साधून संबंधित ई-मेलबाबत अधिक माहिती मागितली आहे.

हेही वाचा >>> अभिनेता पुष्कर जोगच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संताप, संघटनांकडून कारवाईची मागणी

‘माझी मुलगी चर्चेत असलेला एविएटर हा गेम खेळत आहे, स्कायवर्ड एविएटर क्वेस्ट ॲप ती खेळून दररोज एक लाख ८० हजार रुपये कमवते. मला कधीकधी आश्चर्य वाटते की हल्ली चांगला पैसा कमावणे किती सोपे झाले आहे. सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे ॲप अगदी मोफत आहे. कुणीही आयफोनधारक ते डाऊनलोड करू शकतो’, अशी वाक्ये या चित्रफीतीत सचिन तेंडुलकरच्या तोंडी टाकण्यात आली आहेत. याप्रकरणी सचिनने स्वतः खुलासा करीत ही चित्रफीत बनावट असल्याचे स्पष्ट केले होते. सचिन तेंडुलकरने ‘एक्स’ या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिले होते. त्यात अशी जाहिरात कुठेही दिसल्यास याप्रकरणी तात्काळ तक्रार करा, असे आवाहन सचिनने केले होते. समाज माध्यमांनीही यासंदर्भात सतर्क राहणे आवश्यक आहे, असेही त्याने पोस्ट केले होते.

Story img Loader