शिक्षण आणि वास्तविक जीवन यांचा प्रत्येकवेळी मेळ असेलच असे नाही. त्यामुळेच लौकिकार्थाने शिक्षणात फारशी चमक न दाखवलेले विद्यार्थी पुढे आयुष्यात देदिप्यमान कामगिरी बजावतात तेव्हा जगासाठी ते ‘आख्यायिका’ बनून जातात. इतिहासाची पाने चाळली तर अशी उदाहरणे अगदी सहज सापडतील. यात अल्बर्ट आइनस्टाइन, आयझ्ॉक न्यूटन, थॉमस एडिसन, विन्स्टन चर्चिल आदी लोकोत्तर व्यक्तींचा समावेश आहे. या यादीत सचिन तेंडुलकरचाही समावेश होऊ शकतो.
निवृत्ती आणि प्रवृत्ती
क्रिकेट जगतात भल्याभल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणारा आणि कितीही वेगातला चेंडू सीमापार करणारा सचिन शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने मात्र ‘बारावी नापास’ आहे. एखाद्या मुलातील गुण हेरण्याऐवजी आपला अभ्यासक्रम त्याच्यावर लादणाऱ्या शिक्षणव्यवस्थेला ‘नापास’ ठरवणारी सचिनची ही गुणपत्रिका आजही प्रभादेवीच्या एका तरुणाने जतन करून ठेवली आहे.
सचिनची गुणपत्रिका पुढील पानावर..१९८९च्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेटक्षितिजावर सचिनचा उदय झाला. पण शिक्षणातील त्याची गाडी रडतखडत का होईना सुरूच होती. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसतानाही त्याने दादरच्या कीर्ती महाविद्यालयातून बारावी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. १९९२ला तो परीक्षेला बसलाही. मात्र, त्यात त्याला अपयश आले. त्या वेळी वैतागलेल्या सचिनने गुणपत्रिकेचे दोन तुकडे करून महाविद्यालयातच फेकून दिले.
नजाकती फटक्यांचा खजिना
यातला एक तुकडा प्रभादेवी येथील प्रशांत म्हात्रे याला सापडला. प्रशांत अकरावीत प्रवेश घेण्यासाठी ‘कीर्ती’त आला होता. गुणपत्रिकेवरील नाव पाहून त्याने तो तुकडा जतन केला. तो आजतागायत त्याच्याकडे आहे. सचिनची आठवण म्हणून ही गुणपत्रिका आपण जतन करून ठेवल्याचे प्रशांत आवर्जून नमूद करतो.
शिक्षणाला नापास ठरवणारी ती गुणपत्रिका!
शिक्षण आणि वास्तविक जीवन यांचा प्रत्येकवेळी मेळ असेलच असे नाही. त्यामुळेच लौकिकार्थाने शिक्षणात फारशी चमक न दाखवलेले विद्यार्थी पुढे आयुष्यात
आणखी वाचा
First published on: 14-11-2013 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkars mark sheet that fails education