उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके  आढळल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक के ल्यानंतर सोमवारी सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. वाझे यांचे १७ वर्षांपूर्वीही ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात निलंबन झाले होते.

व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ७ मार्चला अनोळखी व्यक्तीविरोधात हत्या, पुरावा नष्ट के ल्याचा गुन्हा नोंदवला. मनसुख यांची हत्या वाझेंनी केली असावी, असा संशय हिरेन कु टुंबाने व्यक्त के ल्यानंतर एटीएसकडून त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर ११ मार्चला वाझे यांची बदली गुन्हे शाखेतून विशेष शाखेत करण्यात आली. एनआयएने अटक के ल्यानंतर विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी वाझे यांना निलंबित केले. मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते, उपायुक्त चैतन्य एस. यांनी या माहितीस दुजोरा दिला.

‘पीपीई किट’मधील

व्यक्ती कोण?

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ बेवारस सोडून आरोपी ज्या इनोव्हामधून पसार झाले तीच गाडी दोन तासांनी तेथे परतली. त्यातून पीपीई किट परिधान के लेली व्यक्ती उतरली. स्कॉर्पिओ न्याहाळून ही व्यक्ती इनोव्हामधून निघून गेली. ही व्यक्ती सचिन वाझे असावेत, असा संशय एनआयएला आहे. न्यायवैद्यक तज्ज्ञांकरवी हे चित्रण आणि वाझे यांची चालण्याची ढब, अन्य लकबी जुळवून एनआयए खातरजमा करणार आहेत.

सीसीटीव्ही, डीव्हीआर गायब

मनसुख यांचे ठाण्यातील निवासस्थान, दुकान आणि भोवतीच्या आस्थापनांमधील ‘डीव्हीआर’चा(सीसीटीव्ही चित्रण साठवून ठेवणारे यंत्र) शोध एनआयए घेत आहे. तपासाच्या नावाखाली गुन्हे शाखेचे पथक हे यंत्र घेऊन गेल्याची माहिती एनआयएला मिळाली. असेच प्रकार वाहनांचे नोंदणी क्र मांक तयार करणाऱ्या अन्य दुकानातही घडल्याची माहिती पुढे आली आहे. येथील दुकानदारांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वाझे यांनी डीव्हीआरबरोबर नोंद वही तपासासाठी सोबत नेली. वाझे राहात असलेल्या ठाण्यातील इमारतीतील डीव्हीआरही पोलीस घेऊन गेले, अशी माहिती स्थानिकांनी एनआयए अधिकाऱ्यांना दिली. एनआयएच्या पथकाने सोमवारी इमारतीच्या सुरक्षारक्षकासह काही रहिवाशांकडे चौकशी केली.

सहकाऱ्यांची चौकशी

गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षातील वाझे यांच्या सहकाऱ्यांकडे एनआयएने सलग दुसऱ्या दिवशी अनेक तास चौकशी केली. वाझे यांचे सहकारी रियाज काझी यांच्याकडे रविवारी दिवसभर चौकशी के ल्यानंतर त्यांना सोमवारीही बोलावण्यात आले होते. या विभागातील अन्य एका अधिकाऱ्याकडेही एनआयएने सोमवारी चौकशी केली. ही चौकशी गुन्ह््यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी, गुन्ह््यातील सहभाग याबाबत होती, असे समजते.

हेतू काय?

उद्योगपती मुके श अंबानी आणि त्यांच्या कु टुंबाला अशाप्रकारे धमकावण्यामागील हेतू स्पष्ट करण्याचा प्रयत्न एनआयएने सुरू के ला. तसेच या गुन्ह््याचा मुख्य सूत्रधार, सहकार्य करणाऱ्या साथीदारांबाबत वाझे यांच्याकडे सतत चौकशी सुरू आहे. मात्र ते चौकशीस सहकार्य करत नाहीत, असा दावा एनआयएने सोमवारी न्यायालयात के ला. दरम्यान, या गुन्ह््यामागील हेतूबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वाझे यांची उच्च न्यायालयात याचिका

सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म यांनी सोमवारी उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) वाझे यांना बेकायदा ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात हजर करण्याचा आदेश एनआयएला द्यावेत आणि ही अटक ही कायद्यानुसार होती हे स्पष्ट करण्यास सांगावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून काही प्रभावी राजकीय नेत्यांनी वाझे यांना लक्ष्य केले आहे. ते वाझे यांना बळीचा बकरा बनवत आहेत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

‘अटक बेकायदा कशी?’

वाझे हे चौकशीसाठी अजिबात सहकार्य करत नव्हते. त्यामुळेच अखेर त्यांना अटक करण्यात आली. शिवाय वाझे चौकशीसाठी येताना आपला भ्रमणध्वनी घेऊन आले नव्हते. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाचा संपर्क क्रमांक देण्यासही नकार दिला. अटकेच्या वेळी ते ज्या शाखेत कार्यरत होते तेथे संपर्क साधून त्यांना अटक करण्यात आली, असा दावा करताना त्यांची अटक बेकायदा कशी, असा प्रश्न ‘एनआयए’ने सोमवारी विशेष न्यायालयात केला.

Story img Loader