अंबानी यांच्या घराजवळ आढळेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मुंबईतील न्यायालयासमोर वाझे यांना कोठडी देण्याची मागणी एनआयए करण्यात आली. एनआयएची मागणी मंजूर करत न्यायालयाने २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.
#SachinWaze remanded to NIA custody till March 25, 2021 in connection to the death of businessman Mansukh Hiran linked to the explosive-loaded SUV outside Mukesh Ambani’s house. pic.twitter.com/ffCK72A3EX
— Bar & Bench (@barandbench) March 14, 2021
दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना शनिवारी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली आहे.
Maharashtra: Mumbai Police Officer Sachin Waze being brought out of NIA office in Mumbai, to be taken to NIA court. He was arrested last night in connection with NIA investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani’s residence. pic.twitter.com/p0zOChXvi1
— ANI (@ANI) March 14, 2021
एनआयएच्या चौकशी आधी काय झालं?
व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक अटक करू शकेल, अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती. मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझेंचा एनआयएने जबाब नोंदवला होता.