क्रिकेटविश्वात भारताचे नाव उंचवणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीचा समावेश पाठय़पुस्तकात करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनविसेपाठोपाठ आता शिक्षण परिषदेनेही ही मागणी केली आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित झाल्याबद्दल सचिनचे राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतरांच्या वतीने जाहीर अभिनंदन करत शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे ही मागणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनीही यापूर्वी ही मागणी केली होती. ‘विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे यासाठी पाठय़पुस्तकातील धडे नेहमीच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील,’ असे मत बोरनारे यांनी व्यक्त केले.
‘सचिनच्या कारकिर्दीचा समावेश पाठय़पुस्तकात व्हावा’
क्रिकेटविश्वात भारताचे नाव उंचवणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीचा समावेश पाठय़पुस्तकात करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
First published on: 18-11-2013 at 02:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachins career shoul included in text books