मुंबई : प्रभादेवी येथे शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक यांच्यात नुकत्याच झालेल्या वादाच्या वेळी गोळीबार केल्याच्या आरोपाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच त्यांचे पिस्तूलही जप्त केले. दुसरीकडे सरवणकर यांच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या आणि त्यांचे छायाचित्र असलेले फलक फाडणाऱ्यांवर मंगळवारी रात्री शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “असा प्रकल्प निसटलाच…”

प्रभादेवी येथे १० सप्टेंबर रोजी झालेल्या वादात सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा शिवसेनेचे नेते सुनील शिंदे यांनी केला होता. या गोळीबारातून एक पोलीस जखमी होण्यापासून बचावला, असा दावाही शिंदे यांनी केला होता. तसेच सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी शनिवारी मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर प्रभादेवीत येथे शिवसैनिक आणि शिंदे गटात वाद झाला होता. मध्यरात्री झालेल्या या वादानंतर अनेक शिवसैनिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यापैकी पाच शिवसैनिकांना अटकही करण्यात आली. 

चौकशीसाठी समन्स

सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सरवणकर यांचे पिस्तुलही जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

पोलिसांना घटनास्थळावरून एक पुंगळी जप्त केली आहे. यासह पिस्तुलाची न्यायवैद्यक तपासणी होणार आहे.  – प्रणय अशोक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५