Sada Sarvankar : मुंबईत राज ठाकरेंनी माहीम या मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना तिकिट दिलं आहे. युती धर्म पाळू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. अमित ठाकरे या मतदारसंघातून उभे आहेत त्यामुळे सदा सरवणकर यांनी या मतदारसंघातून माघार घ्यावी अशी भाजपाची इच्छा आहे. मात्र निवडणूक लढवण्यावर सदा सरवणकर ठाम आहेत. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी वर्षा बंगल्यावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सदा सरवणकर ( Sada Sarvankar) यांनी सांगितलं आहे. तसंच जनतेचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे त्यामुळे मी माघार घेण्याचा काही प्रश्नच येत नाही असंही सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) म्हणाले आहेत.

मनसेच्या दुसऱ्या यादीत अमित ठाकरेंचं नाव

मनसेच्या दुसऱ्या यादीत अमित ठाकरे यांचं नाव आहे. माहीममध्ये त्यांना निवडणुकीचं तिकिट देण्यात आलं आहे. माहीमधून अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंना ही निवडणूक सोपी जावी म्हणून महायुतीत असलेल्या शिवसेनेने उमेदवार मागे घ्यावा असं भाजपाला वाटतं आहे. या संदर्भातल्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. मात्र या चर्चांना सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांनी पूर्णविराम लावला आहे. महायुतीत आम्ही म्हणजचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष असेच आहोत मनसे आमच्या विरोधात आहे हे चित्र स्पष्ट आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याचाच दाखला सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांनी दिला आहे आणि निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे आहे असंही सरवणकर यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा

सदा सरवणकर नेमकं काय म्हणाले?

वर्षा बंगल्यावर बैठक झालेली नाही. मी मुंबईतला आमदार आहे. आमच्या प्रमुखाचं स्थान म्हणजे वर्षा आहे. प्रत्येकवेळी आम्ही एकनाथ शिंदेंना भेटतोच असं नाही. मी स्टाफशी बोललो आणि छोटी मोठी कामं करुन परत आलो.

मी माहीममधून निवडणूक लढणार आणि जिंकणार-सदा सरवणकर

उद्धव ठाकरेंच्या पक्षाने काहीही काम केलेलं नाही. उलट ज्या माणसाने आपल्याला ३६५ दिवस काम केलं आहे. आपल्यातल्या शिवसैनिकाला म्हणजेच मला लोक निवडून देतील याची मला खात्री आहे. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की भाजपासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आहे. यामध्ये कुठेही मनसे नाही. महायुतीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे असंही फडणवीस म्हणाले. निवडणुकीतून मी माघार घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. सामान्य शिवसैनिकांपैकी मी एक आहे. इथली जनता मला निवडून देईल असंही सदा सरवणकर म्हणाले. मी या मतदारसंघातून माघार घेणार नाही तसंच याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार असं सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) म्हणाले. काही वेळापूर्वीच त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.