भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होईल या महाविकासआघाडी सरकारच्या आरोपवर सडकून टीका केली. “घोडेबाजार होईल असं म्हणणं म्हणजे राज्यातील १२ कोटी लोकांचा अपमान आहे,” असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच ज्यांना घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे फुटाणे असतीलच, कारण घोड्याला खायला लागतं,” असं म्हणत त्यांनी मविआ नेत्यांना टोला लगावला. ते गुरुवारी (९ जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदाभाऊ खोत म्हणाले, “घोडेबाजार होईल असं म्हणणं म्हणजे या राज्यातील १२ कोटी जनतेचा हा अपमान आहे. कारण आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्यासाठी काम करायला पाहिजे ही भूमिका ठेऊन मतदारराजा त्याला पाठवत असतो. या लोकप्रतिनिधीवर विश्वास असतो म्हणून मतदारराजा त्याला पाठवत असतो. त्यामुळे ज्यांना घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील. कारण घोड्याला खायला घालावं लागतं.”

हेही वाचा : Vidhan Parishad: “दोन, तीन दिवस मी जेवणार नाही…”; NCP चे अमोल मिटकरी ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज

“माझ्या खिशात शेतकऱ्याच्या घामाची माती आहे. म्हणू ज्याचं पोट शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी आमदार आम्हाला मतदान करेल. शेतकऱ्याच्या घामाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मला आमदार केलं,” असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot criticize mva leaders over allegations of horse trading in rajya sabha election pbs