मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य संस्कृती मंडळावरील अध्यक्ष आणि सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून ३५ नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
साहित्यिक डॉ. सदानंद मोरे हे तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत. त्यांनी अनेक संतसाहित्य विषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. पंजाबमधील घुमान येथे २०१५ मध्ये झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
नवे सदस्य..
डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीसह सदस्यपदी लेखक गिरीश प्रभुणे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, लेखक अरुण शेवते, भारत सासणे, डॉ. मरतड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, संगीतकार संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराव कदम, उत्तम बंडू तुपे, रेणु पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, सिसिलिया काव्र्हालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ. विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए. के. शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ. रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, पत्रकार अरुण करमरकर, शंकर धडके, संजय ढोले, देविदास पोटे, रमेश पवार, डॉ. उत्तम रुद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे यांची नियुक्त करण्यात आली आहे.