महाराष्ट्रात जालना, परभणी, नांदेड, पूर्णा येथील बॉम्बस्फोटांची चौकशीही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवावी अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केल्यानंतर लगेचच, संघ-भाजपमध्ये दहशतवादी कारवायांची प्रशिक्षण शिबिरे चालविली जात असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याने, आयोगाच्या मागणीला महत्व आले आहे. आमच्या या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनीच भगव्या दहशतवादावर ताशेरे ओढले हा केंद्र सरकारकडून मिळालेला प्रतिसादच आहे, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी व्यक्त केली.

Story img Loader