सरकारची न्यायालयात माहिती
केंद्र सरकारने ९७ वी घटनादुरुस्ती केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भातील वटहुकूम येत्या दोन दिवसांत काढला जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता दरायस खंबाटा यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात दिली.
केंद्र सरकारने ९७ वी घटना दुरुस्तीद्वारे सहकार कायद्यातही दुरुस्ती केली असून १५ फेब्रुवारीच्या आधी त्याची अंमलबजावणी करणे सर्व राज्यांना बंधनकारक आहे. त्यामुळेच या घटनादुरुस्तीनुसार वटहुकूम तयार करण्यात आला असून शुक्रवापर्यंत त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच वटहुकूम काढण्यात येईल, अशी माहिती खंबाटा यांनी न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या
खंडपीठाला दिली.