मुंबई : ज्येष्ठ दिग्दर्शिका, नाटककार आणि पटकथाकार सई परांजपे यांना यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. आज दादर येथे होणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ वितरण समारंभात  त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येईल. यावेळी ‘सामान्यांतील असामान्य’ ठरलेल्या नऊ दुर्गाचा सन्मान केला जाणार असून उद्योजिका आणि पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्ष डॉ. स्वाती पिरामल, निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर उपस्थित असतील.

गौरवमूर्ती सई परांजपे यांनी लेखन, आकाशवाणी-दूरदर्शन, व्यावसायिक नाटके, बालरंगभूमी, चित्रपट, माहितीपट, लघुपट अशा अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा निर्माण केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘स्पर्श’ तसेच ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘दिशा’, ‘पपिहा’, ‘साज’ यांसारख्या वेगळय़ा धाटणीच्या त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘पद्मभूषण’ पुरस्काराबरोबरच अनेक मानाचे सन्मान लाभलेल्या सई परांजपे लवकरच एक नवीन नाटकही रसिकांसमोर घेऊन येत आहेत. दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे संध्याकाळी ६.१५ वाजता होणाऱ्या या सत्कार समारंभादरम्यान ‘स्वराशा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी गायलेल्या उत्कृष्ट मराठी गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात येईल. धनश्री देशपांडे, केतकी चैतन्य, राधिका नांदे आणि सोनाली कर्णिक गीते सादर करणार असून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि कुणाल रेगे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

हेही वाचा >>>परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेक तरूणांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून पाच जणांना अटक

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२३’साठी निवड झालेल्या यंदाच्या सत्कारमूर्तीमध्ये ‘कचरावेचक ते पर्यावरणरक्षक’ असा प्रवास केलेल्या सुशीला साबळे, ‘खेळघर’च्या माध्यमातून शाळेपलीकडचे शिक्षण देणाऱ्या शुभदा जोशी, बहुविकलांग, गतिमंद मुलांसाठी गेली ४१ वर्षे काम करणाऱ्या रेखा बागूल, अंधत्वावर मात करत एक आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. कल्पना खराडे, शेतीचा गंध नसतानाही आव्हानांना तोंड देत यशस्वी शेतकरी झालेल्या संगीता बोरस्ते, भारतातील पहिली त्वचापेढी सुरू करणाऱ्या डॉ. माधुरी गोरे, सात लाख हेक्टर जमिनीवर पाणलोटाची कामे होण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैशाली खाडिलकर, शेती आणि जैवतंत्रज्ञानातले संशोधन करणाऱ्या डॉ. रेणुका करंदीकर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताची जागतिक विजेती ठरलेली पहिली महिला खेळाडू अदिती स्वामी यांचा समावेश आहे.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चे यंदाचे दहावे वर्ष असून वाचकांनी पाठवलेल्या नामांकनांमधून नऊ दुर्गाची निवड निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर, उद्योजिका अदिती कारे-पाणंदीकर आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी केली. या कार्यक्रमासाठी काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

मुख्य प्रायोजक  : ’उषा काकडे ग्रुप

सहप्रायोजक :’मे. बी. जी. चितळे डेअरी

’महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड

’टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड

’उज्वला हावरे लेगसी

पॉवर्ड बाय

’केसरी टूर्स

’व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स

’ओ एन जी सी

’दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.

’राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लि.

टेलिव्हिजन पार्टनर

’एबीपी माझा

Story img Loader