तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाइल, फॅशन तिच्याभोवती वेगळे वलय निर्माण करते. मराठी चित्रपटसृष्टीला नवे असणारे हेच ते ग्लॅमरचे वलय तिच्यामुळे प्राप्त झाले. ती.. सध्याच्या जमान्याची लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लोकसत्ता व्हिवा लाउंजमध्ये पाहुणी म्हणून येणार आहे.
व्हिवा लाउंजमधून आतापर्यंत विविध क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी तरुण स्त्रिया वाचकांना भेटल्या आहेत. लाउंजच्या या नव्या पर्वात तरुणाईची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकरला आमंत्रित करण्यात आले आहे. सईच्या चित्रपटांनी गेल्या तीन-चार वर्षांत व्यावसायिक मराठी चित्रपटांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. हल्लीच्या प्रत्येक मराठी निर्मात्याला आपल्या चित्रपटात सई ताम्हणकर हवी असते, कारण सई म्हणजे बॉक्स ऑफिसवरचे यश हे गणित गेल्या काही वर्षांत जमून गेले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील खूप कमी अभिनेत्रींना त्यांच्या फॅशन आणि स्टाइलसाठी नावाजले गेले आहे. सई ताम्हणकर याला अपवाद आहे.
ग्लॅमरस मराठी अभिनेत्री म्हणून तिची ओळख मराठी चित्रपटसृष्टीच्या बाहेरही पोचली आहे. म्हणूनच आघाडीचा फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे सईला त्याच्या डिझाइन्सची प्रेरणा मानतो. या नव्या जमान्याच्या, बेधडक आणि ग्लॅमरस अभिनेत्रीला भेटायची, तिच्याशी संवाद साधायची संधी व्हिवा लाउंजच्या माध्यमातून मिळणार आहे.
दिशा डायरेक्ट यांच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी २४ तास या वाहिनीवरून करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या विनामूल्य शिवाजी पार्कजवळतील प्रवेशिका सावरकर सभागृहात उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेशिका आणि प्रवेश दिले जातील.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2015 रोजी प्रकाशित
व्हिवा लाउंजमध्ये सई ताम्हणकर
तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाइल, फॅशन तिच्याभोवती वेगळे वलय निर्माण करते. मराठी चित्रपटसृष्टीला नवे असणारे हेच ते ग्लॅमरचे वलय तिच्यामुळे प्राप्त झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-03-2015 at 01:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar in loksatta viva lounge